संपादक बनबनराव कांबळे याना नळदुर्ग येथे पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली

संपादक बनबनराव कांबळे याना नळदुर्ग येथे पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली
वागदरी/न्यूज सिक्सर
दैनिक व्रतरत्न सम्राटचे मुख्य संपादक बबनराव कांबळे यांच्या दु:खद निधना बद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक नळदुर्ग ता.तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूर च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली.
आपल्या झुंजार लेखनीतून निर्भिड आणि निपक्षपाती पणे,समाजात घडणाऱ्या सामाजिक, राजकीय,घडामोडींची नोंद घेत बहुजनावरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडुन आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र म्हणून संबंध महाराष्ट्रभर नावारूपाला आलेले दैनिक व्रतरत्न सम्राट चे (मुंबई) मुख्य संपादक बबनराव कांबळे यांचे दि.८ फेब्रुवारी २०२३ रोजी अल्पशा अजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या दु:खद निधनाबद्दल नळदुर्ग ता.तुळजापूर येते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली.
याप्रसंगी पत्रकार संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष सुनील बनसोडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष अरूण लोखंडे,पत्रकार भैरवनाथ कानडे,ईरफान काझी, एस.के गायकवाड, प्रविण राठोड सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे,अकाश भगत,उमेश भगत,संजय राठोड,सह कार्यकर्ते उपस्थित होते.