ब्रेकिंगमहाराष्ट्र
एका भाविकाची लहान मुलगी हरवलेली पोलिसांनी काही तासात आजीच्या हवेली केली.

एका भाविकाची लहान मुलगी हरवलेली पोलिसांनी काही तासात आजीच्या हवेली केली.
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर येथे दि.१५ ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान कर्नाटक विजापूर येथून तुळजाभवानी दर्शनासाठी भाविक आले असता एका आजीबाई सोबत असलेली लहान मुलगी हरवली होती तिचा दोन ते तीन तास शोध घेतला असता ती लहान मुलगी मिळून आली . तुळजापूर येथे विश्वनाथ कॉर्नर जुने बस स्टॅन्ड लातूर रोड येथे शांतता टी पॉइंट येथे बंदोबस्तात असणारे पोलीस अधिकारी पीएसआय सुनील सोनटक्के , हवालदार नामदेव वगारे , हवालदार विश्वजीत गायकवाड सोलापूर महामार्ग सपोसी सचिन वालेकर राजेंद्र रुपनवर होमगार्ड औदुंबर जाधव यांनी परिश्रम घेतले व सदर मुलीला तिच्या आजीबाई जवळ सुखरूप पोच केली व आर्थिक मदत ही केली यावेळी आजीच्या व मुलीच्या डोळ्यांमध्ये आनंदाचेअश्रू अनावर झाले होते.