लायन्स मूकबधिर विद्यालयात दिवाळी सण साजरा
कोपरगाव — आज मंगळवार दिनांक १८/१०/२०२२ रोजी विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षिका श्रीमती नम्रता पंडित व श्रीमती वैशाली पगारे यांनी दिवाळी सणाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यामध्ये वसुबारस ,धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, व भाऊबीज या दिवसांचे महत्त्व सांगण्यात आले. सदर प्रसंगी विद्यालयांमध्ये सुंदर रांगोळी काढण्यात आली. तोरणे व आकाश कंदील लावून विद्यालय सजविण्यात आले .सर्व मुलांनी नवीन कपडे परिधान केले होते. दिवाळीचे महत्त्व विशद करताना प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना लाडू ,करंजी, शेव, फरसाण ,चकली, शंकरपाळे ,आदींचे दिवाळी फराळ वाटण्यात आले. यासाठी राजस्थान स्वीट मार्ट यांचे विशेष सहकार्य लाभले. दीपावली सण साजरा करण्यासाठी सर्व पालक, विद्यार्थ्यी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री .अशोकराव रोहमारे यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थी ,पालक, कर्मचारी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या . विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भास्कर गुरसळ यांनीविद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्टाफने विशेष प्रयत्न केले. शेवटी विद्यालयाचे सामाजिक कार्यकर्ता श्री. नारायण डुकरे यांनी सर्वांचे आभार मानले .व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.