मराठा शोभला !….मराठ्यांचा ओबीसी आरक्षण मागणीचा चा मुद्दा विधिमंडळाच्या पटलावर अधिकृत नोंदला

मराठा शोभला !….मराठ्यांचा ओबीसी आरक्षण मागणीचा चा मुद्दा विधिमंडळाच्या पटलावर अधिकृत नोंदला
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मराठा शोभला मराठ्यांचा ओबीसी आरक्षण मागणीचा चा मुद्दा विधिमंडळाच्या पटलावर अधिकृत नोंदला गेला. माझ्या धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र आमदार कैलासदादा पाटील यांनी विधानसभेत मराठा वनवास यात्रा आणि मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षण मागणी संदर्भात औचित्याच्या मुद्द्या आधारे शासनाचे लक्ष वेधले. कळंब, परंडा या मोर्चाची अधिकृत मागणी ओबीसी मधूनच आरक्षण अशी होती. त्याचाही उल्लेख त्यांनी केला. तसे एवढ्या स्पष्टपणे बोलणारे कैलास पाटील हे मराठ्यांच्या इतिहासात पहिले आमदार म्हणून नोंदले जातील.
मराठा समाजाला आपला सार्थ अभिमान वाटत आहे. हा मुद्दा तडीस लागेपर्यंत अधिक जोरात लावून धरावा ही माफक अपेक्षा. येत्या निवडणुकीत मराठा समाज आपल्या बाजूने ठामपणे उभा राहील याची खात्री देतो.
मराठ्यांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत घुमवा. आपापल्या आमदारांना देखील यातून बोध घेण्यास भाग पाडले पाहिजे. अन्यथा त्यांना येत्या निवडणुकीत कात्रज चा घाट दाखवण्याची तयारी केली जाईल.