शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार – पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार – पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ मनोज मारुतीराव कवडे, वय 38 वर्षे, व्यवसाय वैदयकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर रा. अण्णपुर्णा मंगल कार्यालयाचे पाठीमागे वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे व त्यांचे सोबत असलेले अधिपरिचारीका गुंजकर व कक्ष सेवक अनंत गोरे असे हे उपजिल्हारुग्णालय येथे शासकीय कर्तव्य पार पाडत असताना अनोळखी तीन इसमांनी फिर्यादी व त्यांचे स्टापला शिवीगाळ करुन तु कसे काम करतोस तेच बघतो अशी धमकी देवून शासकीय कामात अडथळा निर्माण करुन दवाखान्यातील अपघात विभागाचे व बाह्यरुग्ण विभागाच्या खिडकीच्या काचा दगड मारुन फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- डॉ. मनोज कवडे यांनी दि.26.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 353, 504, 506, 427, 34 सह कलम 7 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे मागील काही महिन्यापूर्वी रुग्णालयात पोलीस चौकी हवी आहे असं निवेदन दिले होते पोलिस प्रशासनाने दखल घेत फक्त एकच पोलिस कर्मचारी दिला आहे. पण आपली मागणी पोलीस चौकी ची होती. जेणेकरून अश्या लोकावर आळा बसेल.
आनंद कंदले
रुग्ण कल्याण समिती सदस्य उपजिल्हा रुग्नालय तुळजापूर

