ब्रेकिंग
Post-गणेश खबोले

लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालय लोहारा यांच्या वतीने तालुक्यातील लोहारा खुर्द, चिंचोली काटे, सास्तुर, एकोंडी लोहारा, आष्टा कासार इत्यादी गावामध्ये मोहीम स्वरूपात ३० वनराई बंधारे नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मृद संधारण,जल संधारन उपचारविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते, मंडळ कृषी अधिकारी नयन मगर ,एस ए ताराळकर, कृषी पर्यवेक्षक माळकुंजे, श्री फावडे, श्री रवी बनजगोळे, श्री गोसावी, कृषी बाळासाहेब बिराजदार, निळकंठ पाटील, अतुल बिराजदार, माधव बिराजदार, शैलेश जट्टे, नागेश जट्टे,ईश्वर पाटील, किशोर गायकवाड, उमाकांत बिराजदार, चंद्रकांत पाटील, दीपक जाधव, सचिन चेंडकाले,सचिन पवार सरपंच सचिन रसाळ शेतकरी नितीन अंगद रसाळ उपस्थित होते.तसेच युवा प्रशिक्षणार्थी रोहित पूर्णे, अनिल देशमुख, स्वप्नील घोगे, राहुल कडबाने श्रमदानास उपस्थित होते.
यावर्षी मोठ्या प्रमाणत पाऊस झाल्यामुळे ओढ्याला पाण्याची धार सुरू आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आप आपल्या शेताजवळील नाल्यावराती सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या मध्ये नाल्यातील माती,वाळू भरून पिशवी चे तोंड बंद करून नाल्यामध्ये प्रवाहाच्या आडवे रचून घ्यावे. ज्यामुळे पाणी आडून पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिकांना संरक्षित पाणी देता येईल.
श्री महेश देवकाते
तालुका कृषी अधिकारी लोहारा