ब्रेकिंगमहाराष्ट्र
आषाढी एकादशी निमित्त शक्तीपीठ पायी दिंडी पंढरपूर कडे रवाना.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

आषाढी एकादशी निमित्त शक्तीपीठ पायी दिंडी पंढरपूर कडे रवाना.
तुळजापूर : प्रतिनिधी
श्री क्षेत्र तुळजापूर येथून शक्तीपीठ ते भक्ती पीठ आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी शुक्रवार दिनांक १२ रोजी सकाळी नऊ वा. सुमारास कासार गल्ली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दिंडीची पूजा खंडू माऊली गवळी व नगरसेवक अमर मगर यांच्या हस्ते करण्यात आली
यावेळेस वल्लभ कदम, पत्रकार अंबादास पोफळे , सुहास साळुंके , नाना हिबारे , सुदर्शन वाघमारे तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते यानंतर पंढरपूरकडे रवाना झाली या पायी दिंडीत सुमारे अडीचशे महिला व दीडशे पुरुष असून एकूण चारशे वारकरी सहभागी झाले आहेत या दिंडीचा पहिला मुक्काम काठी सवरगाव येथे राहील तर दुसरा मुक्काम वडाळा येथे राहणार आहे ही पालखी दिनांक १६ रोजी सकाळी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथे पोहोचते.